29 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, दिवसाढवळ्या झालेल्या शाळकरी मुलीच्या हत्येने खळबळ उडाली आहे.अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आदित्य समुद्रे नावाच्या एका कुख्यात आरोपीने एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून केल्याचा संशय आहे.आज दुपारच्या सुमारास ही मुलगी शाळेतून परत येत असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.