पोलीस स्टेशन नेर येथील कार्यरत पोलीस शिपाई अंकित दीपक जीरापुरे वय 29 यांना हृदय घाताचा तीव्र झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 27 ऑगस्टला उघडकीस आली. 26 ऑगस्टला रात्री आठ वाजता आपली ड्युटी आटोपून ते दारव्हा येथे परतले.त्या ठिकाणी मध्यरात्री झोपेमध्ये असतानाच त्यांना हृदय घाताचा तीव्र झटका आला या त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई,आजी व विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे.युवा वयामध्ये अचानक मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.