घर घेण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एका पतीने आपल्या पत्नीला त्रास दिल्याची घटना दादावाडी येथे समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पत्नीच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.