भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल संग्राम भंडारे या कथित महाराजांनी जे अपशब्द वापरले, जीवे मारण्याची धमकी दिली, त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई व्हावी.तसेच त्यांचे समर्थन करणाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई करावी या मागण्यांचे निवेदन अकोले तालुक्या महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले.संग्राम भंडारे यांनी घुलेवाडी येथील कीर्तनातून द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.