जिल्ह्यातील विविध ठाण्यांत २० गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या कुख्यात गुंडावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. आकाश उर्फ चिन्ना आनंद आंधेवार (३७, रा. बामनी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) असे त्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. त्याच्या सन २०१० ते २०२५ दरम्यान जिल्हाभरात खून, खंडणी, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, अवैध दारूसाठा बाळगणे, धमकावणे, शासन आदेशांचे उल्लंघन आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हल्ला करणे