आज बुधवारी दुपारी २ च्या सुमारास राज्याचे क्रीडा‚ युवक व कल्याण‚ अल्पसंख्याक विकास औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित 'जनता संवाद' कार्यक्रमात राज्यभरातील विविध भागातून आलेल्या सामान्य नागरिकांना भेट दिली. यावेळी नागरिकांनी मंत्री कोकाटे यांना भेटून विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. मंत्री कोकाटे यांनी सर्वांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची, समस्या आणि मागण्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली.