आज नागपूरातून भव्य काळी मारबत निघाली त्याकाळी भोसले राजकारणातील बाकाबाई यांनी इंग्रजांशी हात मिळविणी केल्याच्या विरोधात काळीमारबत काढण्यात आली होती. या परंपरेचा उल्लेख महाभारतातही दिला जातो. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा नागपूर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. आज तान्या पोळ्याच्या दिवशी 23 ऑगस्टला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नेहरू पुतळा चौकातून मोठ्या उत्साहात शेकडो लोकांच्या गर्दीत ही मारबत करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.