चिपळूण पाचाड गावातील एका गुरांच्या गोठ्यात तब्बल आठ ते नऊ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली . स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या पथकाने आणि सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत या अजगराला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.