अजनाळे (ता. सांगोला) येथे जिल्हा मध्यवर्ती बँक बनावट सोने तार ठेवून १७ लाख ४४ हजारांचे कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी व्हॅल्युएटर संजय दत्तात्रय पंडित (वय ५७, रा. अजनाळे, ता. सांगोला) याला बुधवार, १० सप्टेंबर रोजी सांगोल्यात अटक केली. त्याला सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी मंगळवार, १६ सप्टेंबरपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.