केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब असतील. नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यावर आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लुईस वाडी येथे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.