मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि रेडिमिक्स टँकरचा अपघात घडला आहे. ट्रक आणि रेडिमिक्स टँकरची धडक झाली आणि मालवाहू ट्रक रस्त्यातच उलटला. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मालवाहू ट्रकचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला सारण्यात आलली.