मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे बामन गल्ली भागात एका घरातून शनिवारी सकाळी दुर्गंधी पसरल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात मिळाली. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकासह घटनास्थळी धाव घेतली.घरात प्रवेश केल्यानंतर एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून किमान चार ते पाच दिवसांपूर्वी सदर मयत व्यक्तीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.मृत व्यक्तीचे नाव अतुल भोपाल चौगुले (वय ५६, रा. कव