देवगड तालुक्यातील साळशी येथे, ढोलताशांच्या गजरात आणि “भल्ली भल्ली भावई!” च्या पारंपरिक जल्लोषात, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या साळशी येथे शिवकालीन परंपरेशी नातं सांगणारा भावई उत्सव गुरुवार १७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.