हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठ्यांना आरक्षण देण्यास महाराष्ट्र शासन अनुकूल झाले. पण आज तेलंगाणा शासनाने जातीनिहाय जनगणना करून तिथल्या सर्व मागासवर्गीय जातींना सुमारे ४२% आरक्षण दिले. महाराष्ट्र शासन तेलंगाणा शासनाचा आदर्श घेईल का? अशी प्रतिक्रिया आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १.५० मिनिटाच्या सुमारास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.