कास्तकारांनी यावर्षी काढलेला पिक विमा मुदत संपल्यावर त्वरित त्यांच्या खात्यात जमा होऊन मागील पिकविम्याचे पैसे व्याजा सहीत मिळावे.आपण शेतकरी आहात असे आवर्जुन अभिमानाने सांगता याच अभिमानाने आपले अधिकारात येणाऱ्या सत्रात पीक विम्याचे पैसे मुदत संपताच वितरीत झाले पाहिजे तसेच जो पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला त्या उशिरा मिळणाऱ्या पीक विम्याचे व्याजही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे. अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे पत्राद्वारे माजी राज्यमंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी केली आहे.