मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मूल भेटीच्या तयारीसाठी २७ सप्टेंबर रोजी सुरक्षा तालीम घेण्यात येत होती. यादरम्यान, सिंदेवाही रस्त्यावर मूल शहरापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांडेकर पेट्रोल पंपाजवळ अग्निशमन दलाचे वाहन उलटले.या अपघातात चालक राहुल येडुरवार (रा. चंद्रपूर) जखमी झाला. त्याला तात्काळ मूल ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गाडीतील इतर तीन जण सुरक्षित असल्याचे वृत्त आहे