नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी सदैव २४ तास तत्पर असणारे पोलीस बांधव रक्षाबंधन या सणाच्या दिवशीसुद्धा आपल्या कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असताना त्यांना रक्षाबंधन सणाचा आनंद मिळावा आणि त्यांच्या हातावर बहिणीने राखी बांधावी, या उद्देशाने भाजपा महिला मोर्चाचे भगिनींनी पोंभूर्णा पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांना राख्या बांधल्या व रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप महिला मोर्चाचे वतीने पोलीस स्टेशन पोंभूर्णा येथे रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला.