27 ऑगस्ट चा दुपारी 4 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार इमामवाडा पोलिसांनी रेल्वे इलेक्ट्रिक ऑफिस जवळ तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव लक्की मनपिया असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून सातशे रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.