श्री मोरारी बापू यांचा रामकथा पर्व सोहळा यवतमाळ येथील चिंतामणी मार्केट यार्ड, लोहारा येथे आयोजित केला आहे. या कथा पर्व सोहळ्यासाठी नागरिकांना उपस्थित राहता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने रविवार ७ ते रविवार १४ सप्टेंबर या कालावधीत यवतमाळ शहरातील विविध १८ ठिकाणाहून विशेष बस फेऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.