सट्टा जुगाराचे आकडे घेऊन पैशाच्या हार जितची बाजी लावीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सट्टा जुगाराचे आकडे घेऊन लिहिणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गोलेवाडी येथे घडली. या घटनेत अड्याळ पोलिसांनी सट्टा जुगाराचे आकडे घेऊन लिहिणारा कपिल राजु रंगारी (३०) रा गोलेवाडी यांच्या विरोधात अड्याळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.