गडचिरोली येथे नॅशनल रूरल हेल्थ मिशन योजने अंतर्गत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या आरोग्य सेवकांच्या सेवा नियमित करण्याबाबत त्यांच्या संघटनेद्वारे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सादर आंदोलन स्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेऊन मागण्यांचे निवेदन खासदार नामदेव किरसान यांनी स्वीकारले यावेळी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतीश विधाते व परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले सोबत होते.