अकोले तालुक्यातील देवगाव ग्रामस्थांनी आदय क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जुन्या पुतळ्याची विधीवत पुजा करत स्थापना केली. दोन दिवसांपूर्वी शासकीय अधिका-यांनी जागेच्या वादावरून या पुतळ्याचा आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा काही संबंध नसल्याचे सांगत जागा मालक आणि PWD ने आपसात प्रश्न सोडवावा असे आव्हान केले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास देवगाव ग्रामस्थांनी बहुसंख्येने एकत्र येत राघोजी भांगरे यांचा पुतळा पूर्वीच्या ठिकाणी प्रस्थापित केला आहे.