संपूर्ण कन्नड तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थी बुधवार, 01 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पिशोर नाकावर मा. आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चात सहभागी होतील. हा मोर्चा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून, सर्वांच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. मोर्चा पिशोर नाकापासून या मोर्चात सर्व समाज, विद्यार्थी, सर्व पक्षातील नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जाधव यांनी आज दि 30 स्पटेबर रोजी रात्री 9:30 वाजता केले.