सन 2020 मध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढाळी पोलिसांना प्राप्त झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नागपूर ग्रामीण आणि कोंढाळी पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करत सोशल मीडिया व तांत्रिक पुरावे तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या मुलीला वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघे येथून ताब्यात घेतले.