संगमेश्वर तालुक्यातील पूर्ये तर्फे देवळे (राववाडी) येथील प्रकाश माने यांच्या घराजवळ आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास बिबट्या दिसून आला. प्रकाश रामचंद्र माने हे दुपारी जेवण करून बाहेर पोर्च मध्ये बसले असता त्यांना समोरून कोणीतरी प्राणी जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र नेमका कोण प्राणी हे सीसीटीव्ही कॅमेरा चेक केल्यानंतर लक्षात आले. दुपारी दोन च्या दरम्याने बिबट्या दुसऱ्या घराजवळून प्रकाश माने यांच्या घरासमोरील बागेमधून जात असल्याचे दिसून आले.