महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार भंडाऱ्यात भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाज प्रबोधन, विविध शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी 10 वाजता भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर सामाजिक न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तथा माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, उद्घाटक म्हणून भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ अविनाश नान्हे उपस्थित होते.