भुसावळ पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना १८ ऑगस्ट रोजी जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती स्विकारल्या जाणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, दिनांक ३१ रोजी रविवार असला तरी या दिवशी प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र्य टेबल देण्यात आला असल्याची माहिती दि. ३० ऑगस्ट रोजी भुसावळ नगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.