मनोज जारंगे पाटील यांनी मुंबईतील आधार मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर असून फक्त 5000 लोकांना परवानगी दिलेली असताना बेकायदेशीरपणे आंदोलन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष शंकराव लिंगे यांनी दिली आहे. आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मोहोळ येथे पत्रकारांशी बोलत होते.