राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदुरा तालुका व शहर च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पक्ष प्रवेश करून नूतन कार्यकारणीसुध्दा घोषित करण्यात आली व नियुक्तीपत्र देखील देण्यात आले.यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.