लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील एका आंतरराज्य टोळीचा धुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील एका ३५ वर्षीय तरुणाला १ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालून बनावट लग्न लावल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एजंटसह तीन महिलांना अटक केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे अनेक तरुणांना फसवल्याची कबुली दिली आहे.