आज दि 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारी जनावरांची हाडे तसेच कवट्यांची माळ मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालात महादेवाची पिंड देखील सापडली आहे. महाविद्यालयाच्या विद्याथ्यर्थ्यांना एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. छाप्यात पोलिसांना एक गावठी कट्टा देखील मिळून आला आहे. नियाज नजीर शेख