गडचिरोली तालुक्यातील पोर्ला जवळील नवरगांव येथे च्या रात्रौ नवरगांव शेतकऱ्यांच्या अनेक शेतात हत्तीच्या झुंडीने प्रवेश करून शेतकऱ्यांच्या उभ्या धान शेतपिकाचे २५ ते 30 एकराचे नुकसान केले.यात शेतकरी राजहंस जांभुळकर देवराव धाकडे जासुंदा भैसारे वसंत चुधरी निलकंठ भैसारे विलास गोडमारे दादाजी धाकडे इंदिरा उंदिरवाडे जिजाबाई उंदिरवाडे सहीत बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकाचे नुकसान केलेले आहे.