कोपगाव शहरातील खडकी नजीक असलेल्या साई प्रभानगर मध्ये पुन्हा एकदा चारचाकी वाहन चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कोपरगाव शहरातील साईप्रभा नगर येथिल 45 वर्षीय चंद्रभान साहेबराव भागवत यांनी त्यांच्या मालकीची असलेलेही एर्टिगा चारचाकी गाडी क्रमांक MH 16 BZ 2965 ही त्यांनी राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत लावलेली असताना अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरून नेली आहे. आपली गाडी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर भागवत यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याबाबत तक्रार दाखल केली आहे.