उदगीर शहरातील नांदेड रोडवरील इच्छापूर्ती हनुमान मंदिर परिसरात पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे,याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे,प्रेम संबंधात पती हा अडसर येत होता, म्हणून फिरायला जायच्या बहाण्याने पत्नीने पतीला सोबत घेत व इतर तिघांना सोबत घेऊन इच्छापूर्ती मंदिर परिसरात गेले त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली,त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता त्याला घरी घेऊन गेल्याने पोलिसांना संशय बळावल्याने खुनाचा उलगडा केला