टेंभा गावाचे शिवारातील तापी नदीच्या किनारी असलेल्या आनंदी माता मंदिराच्या शेजारी 39 हजार रुपये किमतीचे ८० फूट लांबी वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत दि. 31 जुलै 2025 रोजी रात्री प्रदीप दौलत सिंग गिरासे यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुढील तपास पोलिस करीत आहे.