अंबड शहरात आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 गुरुवार रोजी भल्या पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास कोर्ट रोड शिवसेना पाटी जवळ बस स्थानक परिसर कॉर्नर जवळ भिषण आग लागली यात पाच दुकाने जळून खाक झाली. ही आग शॉट सर्किट ने लागली का कोणी अज्ञाताने लावली या संदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही. अंबड नगर परिषद अग्निशामक दलाचे जवानाने व अंबड शहरातील तरुण व्यापारी प्रतिष्ठित नागरिक यांनी आग विजवण्यासाठी परिश्रम घेतले. अंबड पोलिसांनी घटनाथळी भेट दिली...