अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष तसेच भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक अजित कुमार मोहंती यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. मोहंती कुटुंबीयांनी देवीची ओटी भरून कुलधर्म व कुलाचार पार पाडले. त्यानंतर देवींची आरती करत मोहंती कुटुंबीयांनी मनोभावे देवींचे दर्शन घेतले. अशी माहिती मंदिर संस्थांच्या वतीने सात सप्टेंबर रोजी दहा वाजता देण्यात आली.