जिवती तालुक्याच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत येथील या आरोग्य केंद्रामध्ये सोयी सुविधांचा अभाव आहेत रुग्णांची गैरसोय होत आहे. जिवती तालुक्याचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी 31 ऑगस्ट रोज रविवारला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान भेट दिली येथील संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उद्धटपणे वागणूक दिल्या जातात तेव्हा या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्या अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा राठोड यांनी दिला