सोमवार दि. 29 सप्टेंबरला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान देवलापार वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या करवाही ते लोधा मार्गादरम्यान करवाही पासून दीड किलोमीटर अंतरावर भर रस्त्यावरच येथून जाणाऱ्या काही लोकांना एका मोठ्या वाघोबाने दर्शन दिले. वाघ बघणारे क्षणिक आनंदले परंतु या परिसरात या मार्गावर वाघाचा वावर असल्याचे लक्षात येताच या मार्ग परिसरातील गावकऱ्यात तसेच मार्गावरून आवागमन करणाऱ्यात प्रचंड दहशत पसरली आहे. सोमवारला कुंदन वैद्य रा. लोधा याला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान हा वाघ दिसला.