ऑफिससमोर उभी असलेली स्कॉर्पिओ कार तोडफोड करून शिवीगाळ, धमकी आणि जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जून रोजी आणि रविवारी (८ जून) पिंपळे गुरव परिसरात घडली.व्यंकटेश राजेंद्र भोसले, विघ्नेश गुणशिलन रंगम (दोघेही रा. गंगोत्रीनगर,पिंपळे गुरव), अनिकेल उरणकर उर्फ उन्या अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.