शहरातील बाजपेई वाॅर्डातील मालवीय शाळेजवळ राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २४) दुपारी ३:१५ वाजता घडली. नंदू ताराचंद मिसाइ (२२, रा. बाजपेई वाॅर्ड) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर नंदू यास तातडीने केटीएस दवाखाना येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ. माधवी येटरे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. तपास पो