भूम तालुक्यात आरक्षणासंदर्भातील मागण्या पूर्ण झाल्यानंतर बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने आणि एकमेकांना मिठाई वाटून समाधान व्यक्त करण्यात आलं. आरक्षणाच्या लढ्यात सातत्याने संघर्ष करणाऱ्या बांधवांनी आज विजयाचा आनंद साजरा करत सरकारचे आभार मानले. या आनंदोत्सवामुळे भूम शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.