हरितालिका सणानिमित्त बुधवार दि. 26 ऑगस्टला सकाळपासून दु. 2 वाजता पर्यंत रामटेक शहरातील महिलांनी घरोघरी स्थापित गौरीची पूजन करून राखी तलाव रामटेक येथे विसर्जन केले. बुधवारला सकाळपासूनच शृंगार आणि नटलेल्या महिलांनी हातात गौरी घेत राखी तलाव गाठले. येथे विधिवत पूजा अर्चना करून आरती म्हणून गौरीचे राखी तलावाजवळ न.प. द्वारा येथे ठेवलेल्या कृत्रिम विसर्जन टॅंक मध्ये विसर्जन केले. यावेळी राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या सौजन्याने महिलांसाठी चाय पाण्याचे दिवसभर नि:शुल्क वितरण करण्यात आले.