मिरज सलगरे रोडवर मल्लेवाडी गावानजीक रस्त्याच्या कडेला झुडपात मंगळवारी मिरज ग्रामीण पोलिसांना पुरुष जातीचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास परिसरातील मेंढपाळ जनावरे चरण्यासाठी रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या पडीक जमिनीत गेली असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला