दिव्यांग, शेतकरी, आदिवासी, पारधी समाज, बेरोजगार, निराधार व इतर वंचित घटक अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या दारी न्यायासाठी धडपड करत असतानाही त्यांच्या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विश्राम भवन, यवतमाळ येथे संघटनेच्या नेतृत्वाखाली व्यापक आढावा बैठक घेण्यात आली.