मिरज ते कवठेमहांकाळ या मार्गावर आज रविवारी दुपारी चारच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनेश तुकाराम वाघमारे (वय २२) हा तरुण आपल्या मोटारसायकलवरून कवठेमहांकाळकडे जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची ठोकर दिली. या अपघातात तो रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळला. धडकेनंतर त्याच्या कमरेस व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने काही काळ तो बेशुद्धावस्थेत पडून राहिला. दरम्यान, घटनास्थळ