सातारतील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाडाची फांदी अचानक कोसळली ही फांदी ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी नागरिक उभे होते, त्यांनी आवाज ऐकताच पळ काढल्यामुळे या अपघातातून बचावले, याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालयातील पार्किंग मध्ये असलेल्या निलगिरीची झाडाची फांदी, आज सोमवार दिनांक 2 जून रोजी दुपारी दोन वाजता, अचानक तुटून कोसळली फांदी तुटण्याचा आवाज येताच, या झाडाच्या खाली उभे असलेले नागरिकांनी पळ काढला, त्यामुळे ते बचावले.