कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यांत गणेशोत्सव २०२५ तसेच ईद-ए-मिलाद मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कर्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केल्याचे म्हटले आहे.