तळोदी येथील गाढवदेव शिवारात शेतात चरत असलेल्या वसंता जामुनकर यांच्या बैलावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या झुडपात दबा धरून असलेल्या वाघाने जीवघेणा हल्ला चढवला यावेळी यावेळी शेतकऱ्याने आरडाओरडा केली असता वाघ पळून गेला मात्र या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला असून शेतकऱ्याचे जवळील ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. ऐन शेतकऱ्याच्या हंगामात बैल अशा तरेणे जखमी झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असुन झालेल्या नुसकांची भरपूर देण्याची मागणी शेतकऱ्याने वनविभागाकडे केले आहे.