खापरी पुनर्वसन येथे हातात लोखंडी चाकू घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव विशाल चौधरी असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून दोनशे रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे